एज्यु जिनियस अकॅडमी एज्यु जिनियस अकॅडमीची स्थापना २०१० साली झाली. या संस्थेचे संस्थापक श्री. विष्णू भोसले यांनी सात वर्षांच्या अध्यापन व संशोधन अनुभवातून ही अकॅडमी उभारली. त्यांच्या करिअरमध्ये १७० हून अधिक विषयांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना JEE, NEET, CET, NDA तसेच इतर विविध Entrance Exams बद्दल योग्य मार्गदर्शन देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी JEE परीक्षेला साधारण १४ ते १५ लाख विद्यार्थी बसतात, तर IIT मध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. NEET परीक्षेला देखील २२ ते २३ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यापैकी मर्यादित विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. अशा स्पर्धात्मक वातावरणात योग्य नियोजन, दर्जेदार मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासपद्धती अत्यंत महत्त्वाची ठरते. अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेचे प्रशिक्षण दिले जात नाही, तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी सखोल Career Counseling देखील केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता, आवड, अभ्यासातील प्रगती आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाते. आमच्या Counseling Services Career Counseling Session Aptitude & IQ Analysis Stream Selection Guidance Engineering & Medical Career Guidance Study Planning & Time Management Motivation & Confidence Building Parent Counseling Session Competitive Exam Roadmap Planning Scholarship Guidance अकॅडमीमध्ये उपलब्ध Courses Science – Maths Question Competition Commerce 5th Class English 7th class English Career Guidance अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच आत्मविश्वास वाढवणे, अभ्यासाची शिस्त निर्माण करणे आणि वेळेचे योग्य नियोजन शिकवले जाते. अनुभवी शिक्षकवर्ग, नियमित टेस्ट सिरीज, प्रगती विश्लेषण आणि वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत होते. गेल्या १२ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एज्यु जिनियस अकॅडमीमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आधुनिक अभ्यासपद्धती यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षेतच नव्हे तर जीवनातही यशस्वी होण्यासाठी सक्षम बनतात. “विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय” या तत्त्वावर कार्यरत असलेली एज्यु जिनियस अकॅडमी ही JEE, NEET तसेच इतर Entrance Exams साठी एक विश्वासार्ह आणि उत्कृष्ट व्यासपीठ आहे.
संस्थापक व मुख्याध्यापक,
रेडिअन्स एज्युकेशन, वेठाळे, राधानगरी
नमस्कार मी आर. जी. पाटील सर. माझी पाल्य राजनंदनी राजेंद्र पाटील हिला बारावी नंतरच्या प्रवेशासाठी एच्यु. जिनिअस अकॅडमीचे संचालक श्री. विष्णू भोसले सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उत्कृष्ट परीश्रम व त्या अनुभवाने सर्वोत्कृष्ट संस्था मिळण्यासाठी सरांनी आम्हाला केलेले मार्गदर्शन हे अमूल्य असे होते आणि त्यामु्ळे सध्या ती इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या भारतातील सर्वोत्तम केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहे. हे श्रेय माझे केवळ आणि केवळ भोसले सर यांना जातेच! याबद्दल मी सरांचा एक पालक म्हणून शतश: ऋणी आहे.
त्याचबरोबर माझ्या रेडिअन्स एज्युकेशन या शिक्षण संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सर नेहमी मार्गदर्शन करीत असतात व त्या मुळे आमच्या तिन्हीही विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
सरांचे मार्गदर्शन यापुढेही आम्हास उपलब्ध राहील हीच अपेक्षा.
अध्यक्ष, संवाद सामाजिक मंडळ, इचलकरंजी
देशात आणि परदेशात शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड संध्या उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज अनेक संधी उपलब्ध आहेत. अशावेळी दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होण्याची गरज आहे. केवळ शासकीय चाचण्यांमधून विशिष्ट परीक्षा देऊन अनेक मुलं आपले स्वप्न पाहत असतात. परंतु या परीक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या परिस्थितीत अनेक पर्याय असे आहेत की ते विद्यार्थ्यांना वेगळ्या क्षेत्रात संधी देऊ शकतात.
याच गोष्टीचा विचार करून एच्यु जिनिअस अकॅडमी या संस्थेचं सुरु केलेलं उत्कृष्ट काम नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही. विद्यार्थ्यांच्या उन्नत भवितव्यासाठी आणि पालकांच्या एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या संस्थेचं सुरु केलेलं हे उत्कृष्ट नवकल्पना अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणार आहे.
या संस्थेचं काम व्यापक करून विद्यार्थ्यांना वेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी नक्कीच दीपस्तंभ सारखं काम करेल, अशी आम्हा सर्वांची भावना आहे.